रस्त्यावरील पुलीया बांधकाम खड्ड्यात पडून कच्चेपार येथील इसमाचा मृत्यू

0
55

यश कायरकर ,तालुका प्रतिनिधी :

तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील वलनी – चिमूर रस्त्यावरील नांदेड समोर कच्चेपार गावाजवळ झालेल्या रस्ता अपघातात कच्चेपार येतील इसम मृत झाल्याची माहिती आज रोजी सकाळी 07.30 वा तळोधी बा. पोलीस स्टेशन ला एक मोटर सा.वरिल ईसम नांदेड ते कच्चेपार रस्त्यावरिल खड्यात पडुन मयत झाल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सदर घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मयत नामे सुनिल गोपाळा चौधरी वय.( 45 वर्षे) रा.कच्चेपार व त्याचा मित्र नामे भास्कर नामदेवराव चौखे वय (50 वर्षे) रा. कच्चेपार हे दोघे दारुच्या नशेत काल दि.14/06/24 रोजी रात्री 08.30 वा चे सुमारास मोटरसायकल क्र. एम एच 34 क्यु 9839 ने नांडेद येथुन कच्चेपार येथे जात असतांना त्यांनी बांधकाम असल्यामुळे बाजूने बनवण्यात आलेल्या रस्त्यावरिल तात्पुरत्या वळण रस्त्याचा वापर न करता नाल्याचे बांधकाम सुरु असलेल्या रस्त्यावरुन सरळ मोटरसायकल नेल्याने नाल्यावरिल पुलाच्या बांधकामा करता खोदण्यात आलेल्या खड्यात पडुन सुनिल गोपाळा चौधरी वय. (45 वर्षे) रा.कच्चेपार याचा जागीच मृत्यु झाला.

मात्र सोबत असलेला जख्मी हा शुद्ध आलेवर झालेल्या घटनेबद्दल व सोबती असलेला मृत झाल्याबद्दल कुणालाही माहिती न देता परस्पर उपचारकरीता नागभिड येथे निघून गेला. मात्र सोबत असलेल्या जख्मी ने कुणालाही सूचना न दिल्यामुळे अपघातातील मृत व्यक्तीचे प्राण वाचवता येऊ शकले नाही. व सकाळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याची सूचना तळोदी पोलीस स्टेशनला दिली. त्यामुळे या घटनेबद्दलही परिसरातील लोकांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाली आहेत. तसेच या रस्त्याचे काम हे गुरुबक्षानी या कंपनीकडे असून या कामाच्या सुरू असलेल्या पुलीया बांधकामाबद्दल व त्याकरिता खोदण्यात आलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांबद्दल सावधानतेचा इशारा असणारे वळणी मार्गाचे सुचना फलक बोर्ड लावले नसल्यामुळे ही हा अपघात झाला हे नकारता येनार नाही. आणि या रस्त्याने बाहेरील तालुक्यातील लोक ये-जा करतात त्यामुळे इतर कुणाचाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम ठेकेदार कंपनीने याकडे लक्ष द्यावे असे लोकांचे मागणे आहे. घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला असुन प्रेत शवविच्छेदनकामी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे पाठविण्यात आलेले आहे. मर्ग दाखल करण्यात आले असुन पुढील तपास तळोदी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित सिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. मंगाम करीत आहेत.

Previous articleसंजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजने अंतर्गत मासिक आढावा सभेमध्ये 140 प्रकरणे मंजूर
Next articleसावरगाव येथिल तरुणामुळे तळोधी पोलीसांना मिळुन आला अट्टल चोरटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here