शिक्षक भारती संघटनेतर्फे विविध कार्यक्रम

0
63

शिक्षक भारती प्राथमिकचे मुल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे सर यांचा आज ९ जूनला ५० वा वाढदिवस चेक बेंबाळ येथे पार पडला . त्यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या अभिष्ठचिंतन दिनानिमित्य शिक्षक भारती संघटनेतर्फे जि.प .प्राथ शाळा चेक बेंबाळच्या परिसरात वृक्षरोपन कार्यक्रम घेण्यात आला . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नोटबूक व पेन वितरीत करण्यात आले . त्यांचा वाढदिवस ही विद्यार्थी व शिक्षक वर्गाला प्रेरणा ठरावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कुटुंबीय व आपेष्ट मंडळीसोबत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी म.रा प्राथ शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शेरकी, जिल्हासरचिटणीस राजेश घोडमारे, चिमूर तालुका अध्यक्ष रावण शेरकरे, केंद्रप्रमुख गजेंद्र कोपलवार, म .रा पुरोगामी शिक्षक समिती तालुका मूलचे अध्यक्ष कैलास कोसरे, मुख्याध्यापक चंद्रशेखर खोब्रागडे, अनिल बडवाईक,शिक्षक भारती सावलीचे अध्यक्ष किसन गेडाम, विजय मिटपलीवार, मुल तालुका छबन कन्नाके, विजय मडावी, कुमदेव कुळमेथे, लोहार समाजाचे कार्याध्यक्ष विनायक हजारे सर , त्याचप्रमाणे आप्तेष्ट मंडळी व मित्रमंडळी उपस्थित होते.सर्व उपस्थित मंडळींनी वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या . व स्नेहभोजनाने कार्यक्रम संपन्न झाला .

Previous articleजागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळोधी वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम
Next articleफूल कोमेजताना:: भाग २  (अज्ञानातून अंधश्रद्धेचा ऊगम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here