वेगळ्या पद्धतीने साजरा केला सातवा महिना

0
56

नागभीड: नागभीड येथील सकाळ वृत्तपत्राचे शहर प्रतिनिधी, तसेच सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड येथील सहा.शिक्षक पराग भानारकर यांनी आपल्या पत्नी सौ. दुर्गा उर्फ अस्मिता भानारकर हिचा सातवा महिना समाजिक उपक्रम राबवीत साजरा केला. त्यांनी आपले मूळ गाव सोनुली खुर्द येथील अंगणवाडी येथे गर्भवती महिला यांना राजगिरा लड्डू पॉकेट भेट दिले तर उपस्थित सर्व अंगणवाडी तील बालकांना बिस्कीट पॉकेट भेट दिले. तर अंगणवाडी सेविका प्रेमिला यशवंत फुकट व मदतनीस उर्मिला अमर नवघडे व आशा वर्कर हर्षा कुळे यांना वटवृक्ष वडाचे झाड भेट स्वरूपात दिले. यावेळी देवपायली – सोनुली च्या माजी सरपंच अर्चना शरद ठाकरे यांची उपस्थिती होती.

पराग भानारकर यांचे कुटुंबं गेल्या अनेक वर्षा पासून स्थायिक असून त्यांचे मोठे वडील श्री.गुलाबराव भानारकर हे कुटुंबा सोबतच समाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या या समाजिक संस्कृतीचा वारसा पुढील पिढी पर्यंत जावा व त्याचे संस्कार गर्भातच बाळाला मिळावे यासाठी हा उपक्रम अनोख्या पद्धतीने अंगणवाडी मध्ये राबविण्यात आल्याची माहिती पराग भानारकर यांनी दिली.

Previous articleपिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ दया, घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून दया शिवसेना उ.बा.ठा.ची मागणी
Next articleजागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळोधी वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here