रस्ता अपघातात सांबर ठार तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील घटना

0
38

यश कायरकर:
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोविंदपुर नियत क्षेत्रातील सारंगगड बीट, कक्ष क्रमांक 65 नजदीक तळोधी- सोनापूर – नेरी रस्तालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अंदाजे वय पाच वर्षे असलेला नर सांबर मृत झाल्याची घटना सकाळी गस्तीवर असलेले वनरक्षक यांच्या निदर्शनास आली.
घटनास्थळी मोक्का पंचनामा करून तात्काळ मृत सांबराला सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणून शवविच्छेदन करून नंतर सांबराला जाळण्यात आले. अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून समोरील तपास तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
काही दिवसापूर्वी नवरगाव नेरी रोडवर सुद्धा एक चितळ मृत झाल्याची घटना घडली होती सकाळच्या किंवा पहाटेच्या वेळेस रेती तस्करी करणारे किंवा इतर वाहने हे भरधाव वेगाने जंगलाच्या रस्त्यातून ये -जा करतात त्यामुळे रस्त्यात अचानक आलेल्या वन्यजीवांचा अपघात होऊन मृत्यूच्या घटना हा सतत घडत असतात. त्यामुळे वन विभागाने या रस्त्यावर जागोजागी तसेच सूचना फलक लावणे गरजेचे झालेले आहे. तसेच जंगलालगतच्या या रस्त्यांमध्ये गतिरोधक सुद्धा असणे आवश्यक आहे असे वन्यजीव प्रेमींचे मागणे आहे.
मृत सांबराचे शव विच्छेदन करून त्यानंतर सांबराला जाणण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार , तथा पशुवैद्यकीय अधिकारी , गोविंदपुरचे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड, गोविंपूरचे वनरक्षक पी.एम. श्रिरामे, येनुली माल च्या वन रक्षक के.आर. सिंग मैडम, तळोधी चे वनरक्षक राजेंद्र भरणे, ‘स्वाब’ संस्थेचे यश कायरकर , नितीन भेंडाळे ,गोपाल कुंभले, गिरिधर निकुरे , कैलास बोरकर इत्यादी सदस्य व वनमजूर उपस्थित होते.

Previous articleचांदापूर येथे शिवजयंती महोत्सव सोहळा उत्साहात
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांची मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here