बुलडाणा जिल्ह्यात आज 188 पॉझिटिव्ह

0
622

514 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; 157 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 702 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 514 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 188 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 172 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 277 तर रॅपिड टेस्टमधील 237 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 534 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 7, चिखली तालुका : धोत्रा 8, धोडप 1, सावखेड नजीक 4, काटोडा 1, बुलडाणा शहर : 28, बुलडाणा तालुका : दहीद 1, लोणार शहर : 7, लोणार तालुका : वडगांव 3, तांबोळा 4, वेणी 1, राजणी 1, वढव 1, सावरगांव मुंढे 2, देऊळगांव कंकाळ 1, बिबी 5, सुलतानपूर 2, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : निमगांव 1, तरवाडी 2, जळगांव जामोद शहर : 1, सिं. राजा तालुका : गुंज 9, वारोडी 1, पिंपळगांव ठोसर 2, मलकापूर पांग्रा 1, दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : अंढेरा 3, रोहणा 2, वाकी 2, मलकापूर तालुका : दुधलगांव 1, नरवेल 1, मलकापूर शहर : 12, मोताळा तालुका : कालखेडा 1, रिधोरा 2, खेडी 1, मोताळा शहर : 2, मेहकर तालुका : पिं. माळी 1, मोळामोळी 4, जानेफळ 4, मेहकर शहर : 3, खामगांव शहर : 23, खामगांव तालुका : खोलखेड 1, मांडका 1, निमकवळा 1, गवंढळा 1, शेगांव तालुका : पहुरजिरा 4 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 188 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 57 वर्षीय पुरूष, पळशी खु ता. खामगांव येथील 68 वर्षीय पुरूष, हिंगणा कारेगांव ता. खामगांव येथील 78 वर्षीय पुरूष, डोणगांव ता. मेहकर येथील 35 वर्षीय पुरूष, आदर्श कॉलनी दे .राजा येथील 66 वर्षीय महिला व गणपती नगर, मलकापूर येथील 90 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज 157 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार : 7, मोताळा : 7, दे. राजा : 6, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 42, नांदुरा : 13, खामगांव : 22, चिखली : 23, मलकापूर : 9, सिं. राजा : 7, शेगांव : 18, मेहकर : 3.
तसेच आजपर्यंत 30300 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.                  त्याचप्रमाणे आजपर्यंत 5977 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5977 आहे.
आज रोजी 900 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 30300 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7185 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5977 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1114 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 94 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Previous articleसीईटी परीक्षेकरिता एसटी सोडणार विशेष बस
Next articleओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा- माळी महासंघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here