Home मूल मंदिरातून घरी परतणा-या महिलेचे 69 हजाराचे मंगळसुत्र लुटले
खदान पोलिस ठाण्याअंतर्गत बालाजी नगरातील घटना
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकाेलाः मंदिरातून घरी परतणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लुटल्याची घटना खदान पाेलिस स्टेशनअंतर्गत येणा-या बालाजी नगरात मंगळवारी रात्री 7.45 मिनिटांनी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात दाेन चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणूका आनंद मिटकरी वय ३९ वर्ष रा. लक्ष्मी हाऊसिंग सोसायटी, किर्ती नगर, अकोला यांनी तक्रार दिली की, त्या सौ. वर्षा मिटकरी, सौ. मनिषा नितीन देशमुख, सौ. अनुराधा महादेव वीर यांच्यासोबत महादेव मंदिर बालाजी नगर येथे गेल्या होत्या. मंदिरातून परतत असतांना ३० ऑगस्टच्या रात्री पावणेआठ वाजता समोरून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर दोघे आले. त्यापैकी एकाने गळ्यातील २७ ग्रॅमचे ६९ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र झटका देवून तोडून लुटले. व मोटारसायकल जोराने घेवून पारसकर शोरूमकडे पसार झाले. त्यावेळी त्यांनी आरडाआरड केली. मात्र रस्त्यावर कुणीही नव्हते. काळ्या रंगाची मोटारसायकल चालवणा-या व्यक्तीने काळसर रंगाचे शर्ट व मागे बसलेल्या युवकाने पांढरा शर्ट व पाठीवर करड्या रंगाची बॅग लटकवली होती. घटनेनंतर तत्काळ त्यांनी त्यांचे पती आनंद मिटकरी यांना बोलावले. त्यानंतर खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी कलम ३९२, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन लक्ष्मण मेतकर करीत आहेत. गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
© All Rights Reserved