चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरला 2 लाख रुपयांचा दंड

0
73

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: गुडघेदुखी,सांधेदुखी, टाचेच्या वेदना,पेन फीलचा उपचार यशस्वीपणे करण्यात येणार असल्याचा प्रचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरास ग्राहक न्यायमंचाने दोन लाख रुपयाची नुकसान भरपाई रुग्णास देण्याचा आदेश बजावला आहे.
जळगाव जिल्ह्यातील सौ कल्पना माधवराव गवांदे ही 52 वर्षीय गुडघेदुखीचा त्रास असणारी महिला तेल्हारा येथील डॉ द्वारकादास नारायण राठी यांच्या हॉस्पिटल मध्ये गुडघेदुखीच्या उपचारासाठी आली असता डॉ राठी यांनी चुकीचा उपचार करून गुडघ्यात इंजेक्शन टोचून गुडघ्यात सेप्टिक शॉक निर्माण केला. डॉ राठी यांच्या अशा चुकीच्या उपचारामुळे या महिलेस असेही वेदना होऊ लागल्या नंतर सौ गवांदे यांनी जळगावचे डॉ अनिल खडके यांच्याकडे उपचार सुरू केला. या उपचारात डॉ खडके यांना डॉ राठी यांनी उपचार केलेल्या गुडघ्यात सेप्टिक शॉक निर्माण झाला असल्याचे आढळून शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचा अभिप्राय गवांदे या महिलेस दिला.दि 22 सप्टेंबर 2018 ला जळगाव येथील डॉ खडके यांच्या हॉस्पिटलमध्ये या महिला रुग्णाची गुडघ्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.यात नाहक या महिला रुग्णास चार लाख रुपयांचा खर्च आला.हे सर्व डॉ राठी यांचा हलगर्जीपणा, सेवेत न्यूनता व चुकीच्या उपचारामुळे होऊन यात अनाठही खर्च ऑपरेशनच्या माध्यमातून झाला असल्याचे सौ गवांदे यांच्या निदर्शनात आले. सबब चुकीच्या उपचार करणाऱ्या डॉ द्वारकादास नारायण राठी यांच्या विरोधात सौ कल्पना गवांदे यांनी अकोला येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात क्षतीपूर्तीसाठी तक्रार दाखल केली. ग्राहक न्यायमंचाने या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सककडून वैद्यकीय अहवाल मागितला.या अहवालात डॉ राठी कडे अस्थीरोग संदर्भात कुठलीही पदवी,प्रमाणपत्र नसतांना देखील त्यांनी रुग्ण सौ गवांदे
यांच्यावर धोकादायक उपचार केल्याचे आढळून आले. सबब या प्रकरणावर युक्तिवाद होऊन अखेर ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या अध्यक्ष सौ एस एम उंटवाले,सदस्य सुहास आळशी,उदयकुमार सोनवणे यांनी डॉ द्वारकदास नारायण राठी यांनी गुडघे दुखीची रुग्ण सौ कल्पना गवांदे यांच्या उपचार सेवेत हलगर्जीपणा,सेवेत न्यूनता व चुकीच्या उपचार केला असल्याचा निर्वाळा देत रुग्णास झालेल्या त्रासापोटी 45 दिवसांच्या आत दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.निर्धारित कालावधीत रक्कम अदा केली नाही तर 8 टक्के दराने व्याजासह रक्कम देण्याचे आदेश डॉ राठी यांना दिलेत. सौ कल्पना गवांदे यांच्यातर्फे एड इलियास शेखानी यांनी कामकाज बघितले.

Previous articleसेनेचे तत्कालीन क्रिडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडेंना दोन 2 वर्षांची शिक्षा
Next articleविनयभंग प्रकरणातील लाखपुरीच्या आरोपीस सात वर्षाची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here