दामिनी’ app चा वापर करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

0
102

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला :पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वीज कोसळण्याबाबतची पूर्वसुचना प्राप्त व्हावी यासाठी ‘दामिनी’ हे अॅप तयार केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी, ग्रामस्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच गावातील सामान्य नागरिक यांनी दामिनी ॲप डाऊन लोड करावे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. या ॲपमुळे वीज कोसळण्याच्या 15 मिनीटे आधी वीज कोसळण्याची स्थिती व ठिकाण दर्शविले जाते. तेव्हा दामिनी ॲपच्या माध्यमातून प्राप्त सुचनेचा वापर आपल्या परिसरातील नागरिकांना खबरदारीची पूर्वसुचना देण्यासाठी करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

Previous articleअग्नीविर योजनेमागे भाजपा व आरएसएसचा गुप्त अजेंडा : अॅड. प्रकाश आंबेडकर
Next articleदिव्यांग युडीआयडी प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी विशेष मोहीम मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here