अकोला: सन 2014 मध्ये मोदीजींच्या नेतृत्वात या देशात सत्तापालट झाली भारतीय जनता पक्षाचं बहुमताचं सरकार आलं सकारत्मक ऊर्जेने काम करण्याच्या मानसिकतेला धरून देशाच्या सर्वांगीण विकासाकरता हे सरकार काम करेल हा विश्वास सामान्य नागरिकांचा होता आणि तोच सार्थकी लावत मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात मा.नितीनजी यांची केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री म्हणून नियुक्ती झाली या आधी सुद्धा 1995 ला महाराष्ट्रात सेना भाजप च युतीच सरकार आलं त्यावेळी नितीनजी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधून त्यांनी या दोन्ही मोठ्या शहरातील अंतर कमी करत राज्याच्या शिरपेचात एक मनाचा तुरा रोवला त्यावेळी हिंदूहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी नितीनजींना “रोडकरी” अशी पदवी दिली जी आजतागयत जनसामान्यात रुजलेली आहे.
देशात रस्त्यांचं जाळं निर्माण करत इन्फ्रास्ट्रक्चर च्या माध्यमातून विकासाची गंगा वाहायला लावणारे दूरदृष्टी नेतृत्व म्हणजे नितीनजी गडकरी,2014 ला मंत्री झाल्यानंतर 2015 साली नितीनजी नी नॅशनल हायवे नं 6 च्या रुंदीकरण कामाचे भूमिपूजन करण्या करता अकोला आले असता त्यांच्या समोर माजी केंद्रीय राज्य मंत्री व अकोला जिल्ह्याचे खासदार मा.संजयभाऊ धोत्रे यांनी अकोला शहरात उड्डाणपुल देण्याबाबत चा प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला जेष्ठ नेते व अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धनजी शर्मा,अकोला पूर्व चे आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष रणधीरभाऊ सावरकर यांनी अनुमोदन दिले होते त्याच प्रस्तावाचा विचार करत त्याच सभेत 137 कोटी रुपयांचा भरीव निधी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी घोषित केला होता आणि आज तो पूल बनून तयार असून येत्या 28 मे 2022 मा.नितीनजींच्याच हस्ते त्याचे लोकार्पण आहे.

अकोला शहरात उड्डाणपूल देण्याबाबत नितीनजींनी घोषणा तर केली पण अकोला शहराच्या रहदारीचा मुख्य प्रवाह हा पूर्वे कडून पश्चिमे कडे जाण्याचा जास्त असून मंजूर झालेला उड्डाण पूल हा उत्तरेपासून दक्षिणे कडे जाणारा आहे यामुळे जेल चौकातून एखादा व्यक्ती जर उड्डाणपुलावर चढला तर ती व्यक्ती सरळ जिल्हा सत्र न्यायालय जवळ उतरेल अशी ती रचना होती पण या पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटेलच असं चिन्ह काही दिसण्याजोग नव्हतं 2019 ला पुन्हा मोदीजींची सरकार आली अकोल्याचे खासदार मा.संजयभाऊ धोत्रे केंद्रीय मंत्री झाले 137 कोटींचा भरगोस निधी मंजूर झाला होता आणि केंद्रीय स्तरावरील बांधकामाचा आराखडा असल्यामुळे बदल न होण्याचे चिन्ह जास्त होते त्यावेळी मा.संजूभाऊ धोत्रे यांच्या दूरदृष्टी मुळे आणि अभ्यासू विषय मांडणी मुळे पहिल्यांदा केंद्रीय आराखड्यात बदल होऊन उड्डाणपुलाला दोन ठिकाणी पंक्चर देण्यात आलं एक टॉवर चौकात आणि एक अशोक वाटिका चौकात जेणेकरून गौरक्षण रोड,कौलखेड,सिंधी कॅम्प बघतील व्यक्ती ला जर बस स्टॅन्ड चौकातील ट्राफिक चुकवून डायरेक्ट टॉवर चौक किंवा क्रिकेट क्लब जवळ जायचे असेल तर ती व्यक्ती अशोक वाटिका किंवा सिद्धी कॅम्प चौक या दोन ठिकाणाहून उड्डाणपुलावर चढून डायरेक्ट क्रिकेट क्लब जवळ जाऊ शकेल आणि ज्याला टॉवर चौकात जायचं असेल तर टॉवर चौकात जनता भाजी बाजार जवळील पंक्चर हुन टॉवर चौकात उतरू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली.
अकोला शहरातील बस स्टॅन्ड चौकातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा म्हणून निशांत टॉवर ते जनता भाजी बाजार असा एक अंडर पास देखील त्याच आराखड्या नुसार मंजूर करून तयार करण्यात आला जेणेकरून बस स्थानकात जाणाऱ्या बसेस ला रस्त्यावरील वाहतुकीचा त्रास होणार नाही आणि गांधी रोडच्या बाजूने येणाऱ्या व्यक्ती ला डायरेक्ट जनता बाजाराजवळ या अंडर पासमुळे जात येईल अशी व्यवस्था केली गेली.तसेच डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ नॅशनल हायवे 6 मुळे दोन भागात वाटले गेले असून मुलांचे वसतिगृह आणि कृषी महाविद्यालय यांच्या मधनं नॅशनल हायवे गेल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते त्याला रोखण्या करता आणि नॅशनल हायवे च्या ट्राफिक ला विद्यापीठ परिसराचा त्रास होऊ नये म्हणून डॉ.पंदेकृवि परिसरात देखील एक अंडरपास याच आराखड्याच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात माजी केंद्रीय राज्य मंत्री व अकोल्याचे खासदार मा.संजयभाऊ धोत्रे यशस्वी ठरले.

अकोला जिल्हा सह शहराच्या विकासासाठी मा.नितीनजी आणि मा.संजयभाऊ धोत्रे यांचा विकासात्मक दृष्टीकोन कामात आला असून उड्डाणपूल,अंडर पास यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि शहराच्या विकासात एक नवा मनाचा तुरा रोवला गेला तसेच शिवनी शिवर रिधोरा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तसेच चौपदरीकरणाचे लोकार्पण सोहळा. दिनांक 28 मे शनिवार रोजी होत असून यासाठी नामदार नितीन गडकरी राजराजेश्वर नगरी मध्ये येत आहे. यावेळी खासदार संजय भाऊ धोत्रे यांची प्रकृती व त्यांच्याशी चर्चा विनिमय खासदार धोत्रे यांच्या निवासस्थानी नामदार गडकरी करणार आहे तसेच रावण कर हॉस्पिटल लोकार्पण सोहळा होणार आहे अशोक वाटिका चौकापासून उड्डाणपुलाचे उद्घाटन ना. गडकरी करणार आहे. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी शहराच्या विकासासाठी 35 कोटी रुपयांची विशेष निधीची मागणी केली आहे व अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी हैदराबाद धर्तीवर नवीन बायपास 22 किलोमीटरचा करण्यासाठी मागणी करणार आहे तसेच अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी बार्शीटाकळी रेल्वे गेटवर उड्डाणपूल करिता आमदार हरीश पिंपळे तर आकोट रेल्वे स्टेशन गेटवर उड्डाणपुलासाठी आमदार प्रकाश भारसाकळे नामदार गडकरी यांना साकडे घालणार आहे अकोला शहराच्या विकासासाठी व श्चिम विदर्भाच्या विकासासाठी आमदार वसंत खंडेलवाल व महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल सुद्धा वेगवेगळ्या मागण्या नामदार गडकरी कार्य करुन सामाजिक समतोल सोबत महा विकास आघाडीच्या काळात गेल्या दोन वर्षात विकासाचे जे थांबले आहेत या कामांना गती देण्यासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे स्थानिक क्रिकेट क्लब अकोला शहरात ठिकठिकाणी भाजपाची झेंडे बॅनर व आपले लाडके नेते विकासाचे उद्दिष्ट घेऊन कार्य करणारे नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेसाठी स्थानिक क्रिकेट क्लब परिसर सजवण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी नगरसेवक सातत्याने गेल्या आठ दिवसापासून कार्यरत आहे या भव्यदिव्य कार्यक्रमात जवळपास 30 हजार नागरिक उपस्थित राहणार आहे यासाठी वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून नागरिकांना निमंत्रण देण्याचे काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आघाडीचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्ष विजय अग्रवाल जातीने लक्ष देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, अशी माहीती जिल्हा भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरिश जोशी यांनी दिली आहे.