पर्यटनासाठी गेलेल्या अकोल्याच्या दोन युवकांचा तेलंगणातील बासर येथे नदीत बुडून मृत्यू

0
121

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची माहिती
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: तालुक्यातील भौरद येथील प्रतिक महेश गावंडे वय २२ वर्ष व भारती प्लाट जुने शहर अकोला येथील किरण लटकुटे वय २१ वर्ष या दोन युवकांचा तेलंगणातील निर्मल जिल्हयातील भायनासा तालुक्यातील बासर येथे नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. १४ मे रोजी घडली. सदर घटनेची माहिती भायनासाचे जिल्हा महसुल अधिकारी रमेश राठोड यांच्याकडून प्राप्त झाली आहे. उद्या दि. १५ मेरोजी दोन्ही युवकांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती अकोला जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली आहे. दरम्यान अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या घटनेची दखल घेवून प्रशासनाला आवश्यक ती मदत पुरवण्याच्या सुचना दिल्या आहेत. या संदर्भात बासरच्या पुढील असलेल्या भैसा येथील बालाजी ट्रान्सपोर्टचे संचालक किशोर शर्मा यांचे परिचित असलेले अथर भाई यांनी मृतक युवकांच्या नातेवाईकांना मोठी मदत केली.

Previous articleनियमित उपचाराने नियंत्रणात राहतो दमा.. दमा तज्ज्ञ डॉ. संजय भारती यांची माहिती
Next articleअकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाव्दारे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here