जगाला निरामय करण्यासाठी होमिओपॅथी काळाची गरज : होमिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. संदिप चव्हाण

0
169

अकोल्यात जागतिक होमिओपॅथीक दिन उत्साहात साजरा

मंगेश फरपट @ व-हाड दूत न्यूज नेटवर्क 

अकोला: डॉक्टर सॅम्युअल हॅनिमेन यांच्या जयंती निमित्य जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा होत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जागतिक होमिओपॅथिक दिवस अकोला येथील गोरक्षण रोडवरील इनकम टॅक्स चौकात जनरल प्रॅक्टीशनल असोसिएशन हॉल मध्ये आज दि. १० एप्रिलरोजी साजरा करण्यात आला. यावेळी होमिओपॅथी तज्ज्ञ तथा जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सचिव डॉ.संदिप चव्हाण यांनी होमिआेपॅथीचे महत्व विषद करतांना सांगितले की, जगाला निरामय करण्यासाठी होमिओपॅथी काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुखी जीवनासाठी होमिआेपॅथीचा स्विकार करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर श्री. रोठे होते. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. रोठे म्हणाले की, होमिओपॅथी चा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संजीवनी आहे. तर ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर किशोर मालोकार यांनी संपूर्ण  होमिओपॅथिक तज्ञांनी एकत्रित येऊन होमिओपॅथीचा प्रचार-प्रसार करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाला आय.एम.ए चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अनुप कोठारी, अ.हि.प. चे अध्यक्ष डॉ. युवराज देशमुख, जी.पी.ए. चे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष डॉ. सुनील फोकमारे, डॉ. अशोक ओळंबे , जी.पी.ए. अध्यक्ष  डॉ. सुनील बिहाडे, डॉ. सुरज खंडेलवाल, डॉ.अविनाश गिराम , डॉ.प्रकाश डिक्कर, डॉ.रविंद्र पवार, डॉ.अनिल जैन, डॉ.युवराज देशमुख , डॉ.अरविंद गुप्ता , डॉ.राजेश काटे , डॉ.जया महल्ले , डॉ.संजय पाटील , डॉ. भांगडिया , डॉ.गजानन आवदे ,डॉ.शिवराज वानखडे, डॉ.प्राची ठाकरे , डॉ.जया महल्ले, डॉ.योगिता चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleबोगस दस्ताऐवजाच्या आधारे फसवणुक; ‌विवेकानंद आश्रम हिवरा बु. चे उपाध्यक्ष अशोक पाध्ये यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
Next articleनियमित उपचाराने नियंत्रणात राहतो दमा.. दमा तज्ज्ञ डॉ. संजय भारती यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here