– आमदार अमोल मिटकरी यांचे विशेष व्याख्यानाचाही कार्यक्रम
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य धोबी परीट सर्व भाषिक महासंघ महाराष्ट्र यांच्यावतीने गेल्या 10 वर्षापासून दरवर्षी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्सव विविध प्रकारचे उपक्रम घेवून साजरा करण्यात येत आहे. यावर्षी सुद्धा गाडगेबाबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
अकोला शहरातील प्रमिलाताई ओक हॉल येथे 23 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजता पासून दुपारी तीन वाजेपर्यंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकम संपन्न होणार आहेत. यामध्ये दारू बंदीसाठी प्रयत्न करणा-या व्यक्तींसह दारू बंदीसाठी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांचा सत्कार करण्यात येणार आहे. या उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय धोत्रे , पालकमंत्री ओमप्रकाश कडू, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू बुंदेले हे असतील. कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सदस्य, कोरोना योद्धा, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र धोबी समाज महासंच कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली आहे.