– शिवजयंती उत्सवात सहभागी होण्याचे निरंजन पावसाळे यांचे आवाहन
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता देशमुख पेठ मधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य शिवजयंती सोहळा संपन्न होत असून शिवप्रेमी जनतेने जयंती उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निरंजन पावसाळे यांनी केले आहे.
मागील सात दिवसापासून शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रम व उपक्रमांची मांडणी करण्यात आली. यात शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी,युवक युवतींनी उस्फूर्त प्रतिसाद देत जयंती सप्ताहात सहभाग घेतला. प्रामुख्याने उद्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी पार्क परिसरात सकाळी 6 वाजता शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी 9 वाजता शिव शाहिरांचे पोवाडे व शिवगीत स्पर्धा होणार आहे. दुपारी 12 वाजता येथेच किल्ले बांधणी स्पर्धा होऊन दुपारी 4 वाजता परिसरात देखावे साकार करण्यात येणार आहेत.साय 6 वाजता जिजाऊ व बालशिवाजी वेशभूषा स्पर्धा होणार असून रात्री 7 वाजता भव्य शिवप्रताप महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. या शिवप्रताप महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महा नाटिका सादर करण्यात येणार असून यात स्थानिक कलावंत सहभागी होणार आहेत. या शिवजयंती उत्सवात महिला पुरुष व शिवप्रेमी युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निरंजन पावसाळे, समिती कार्याध्यक्ष पवन महल्ले, समिती सचिव चंद्रकांत झटाले, शोभायात्रा प्रमुख पंकज जायले समवेत सागर तिवारी, मयूर हलवणे, आनंद पावसाळे, सागर वाघोडे, अक्षय झटाले, ऋषिकेश पावसाळे, संदीप बाथो यांनी केले आहे.