मंगेश फरपट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने स्थानीय स्वराज्य भवनात सुरू असलेल्या संक्रांत महोत्सवात संक्रांत सुंदरीचा मान सौ पल्लवी डोंगरे यांना मिळाला. यात द्वितीय पुरस्कार श्रद्धा देशपांडे यांना तर तृतीय पुरस्कार तनुश्री भालेराव यांना बहाल करण्यात आला. या स्पर्धेत सात्वनापर पुरस्कार मनीषा वाघोडे व शुभांगी ठाकरे यांना मिळाला.
अकोला शहरातील स्वराज भवन प्रांगणात महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित दोन दिवसीय संक्रात महोत्सवाचा गुरुवारी संध्याकाळी थाटात समारोप झाला. या समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, ज्येष्ठ नेते रमाकांत खेतान,उत्सवाचे मार्गदर्शक व जिल्हा महासचिव अविनाश देशमुख,
महिला महानगराध्यक्षा पुष्पाताई देशमुख, सागर कावरे,उत्सवाच्या आयोजक व महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ पूजा काळे, डॉ. वर्षा बडगुजर, रेवतीताई देशमुख,राजीव इटोले,गणेश कळसकर, संतोष गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी उत्सवाचे मार्गदर्शक अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा काळे यांनी साकार केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करीत अशा उपक्रमामुळे काँग्रेसची सांस्कृतिक फळी गतिमान होऊन अशा उपक्रमांना लोकप्रियता मिळणार असल्याचे सूतोवाच करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात.या संक्रात सुंदरी स्पर्धेत सौ कोमल साधवानी,पल्लवी जोग,प्रांजली सावळे,प्रणाली गोंधळे,वर्षा भारुड,दिपाली दाळू,शुभांगी ठाकरे,राखी इंगळे,पुष्पा कांबळे आदींनीही सहभाग घेत आपल्या कलेची चुणूक दाखवली.स्पर्धेचे परीक्षक म्हणून वेशभूषाकार शरद भोयर यांनी कामकाज पाहिले.
प्रस्तुत स्पर्धा उत्कृष्ट वेशभूषा,उत्कृष्ट पेहराव व उत्कृष्ट वक्तृत्व यावर आधारित होती.कार्यक्रमाचा प्रारंभ युवतींच्या समूह नृत्य व सामूहिक उखाणे कार्यक्रमाने करण्यात आला.यावेळी युवतींनी उत्कृष्ट नृत्य सादर करून जल्लोष निर्माण केला.प्रास्ताविक पूजा काळे यांनी करून या उपक्रमाची माहिती देत महिला काँग्रेसच्या वतीने अशा पद्धतीचे रचनात्मक उपक्रम साकार करण्यात येणार असल्याचे सांगितले.संचालन सौ प्रियंका जोशी यांनी आभार आकांशा गोमासे यांनी तर व्यवस्थापन सागर कावरे व सर्व चमुनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता स्वानंदी पांडे,वंदना गोमासे,कार्तिक पोधाडे,अंकुश भेंडेकर,प्रवीण काळे,मंगेश वानखड़े आदीनी मेहनत घेतली.कोविड नियमांचे पालन करून आयोजित या प्रदर्शनीच्या समारोपीय सोहळ्यात मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.