अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये वय ७१ यांचे आज कोरोनाने निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसापासून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
अकोला जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून आतापर्यंत ७१८८ रुग्ण आढळून आले असून २२५ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या १५३१ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाची आकडेवारी धक्कादायक असली तरी अजूनही नागरिक गंभीर होतांना दिसत नाहीत. रविवारी संध्याकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त अहवालानुसार, आज दिवसभरात ८० अहवाल पॉझिटिव्ह आले यापैकी २१ जणांचे अहवाल संध्याकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सात महिला व १४ पुरुष आहे. त्यातील शास्त्री नगर येथील चार जण, खडकी, कौलखेड, गांधीग्राम व बाशीर्टाकळी येथील दोन जण, उर्वरित कान्हेरी सरप, तुकाराम चौक, लेबर कॉलनी जूने तारुफैल, खडकी, रामनगर, पिंपरी खु., वाशिम बायपास, मोठी उमरी व रतनलाल प्लॉट येथील रुग्णांचा समावेश आहे.