वाघाचा शोध लागेना, वनविभाग हतबल

0
219
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
खामगाव : गेल्या ५ दिवसांमध्ये शहरातील विविध भागात सहा वेळा वाघ दिसून आला आहे. असे असले तरी अद्याप या वाघाला जेरबंद करण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. आजही वनविभागाची शोध मोहीम सुरु आहे. सध्या ही मोहीम ड्रोन कॅमेऱ्यासह वनकर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जात आहे.
शहरामध्ये गेल्या ५ दिवसांपासून वाघाची शोध मोहीम राबविल्या जात आहे. कारण ४ डिसेंबर रोजी सर्वप्रथम पहाटे साडे चार वाजता सुटाळपुरा भागातील प्रा. राजपूत यांच्या घरावरील सीसीटीव्हीत वाघ दिसून आला होता. ही माहिती वनविभागाला देण्यात आली होती. त्यामुळे वनविभागाने शोध मोहीम सुरु केली. याच शोध मोहीमेत साडे चार वाजताच्या दरम्यान बुंदले यांच्या शेतात
वनकर्मचाऱ्याला वाघाचे अस्तित्व असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ही मोहीम तीव्र करण्यात आली होती. परंतु अंधार पडल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली होती. त्याच दिवशी रात्री साडे दहा वाजताच्या ७० सुमारास आई साहेब मंगल कार्यालयाजवळून रंभाजीनगरातील मोकळ्या जागेत वाघ दिसून आला. तसेच याच परिसरातील राजू नेटके यांच्या घरावरील सीसीटीव्हीत सुध्दा वाघ आल्याचा व्हीडीओ व्हॉयरल झाला. तर ५ डिसेंबर रोजी दुपारी न.प. शाळा क्र. ३ परिसरात वाघ वनकर्मचाऱ्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता परत याच भागात वाघ दिसला होता. परंतु तेथेही रिक्यु ऑपरेशन अंधार पडल्याने राबविता आले नाही. अशा प्रकारे शहरात ६ वेळा वाघाचे अस्तित्व जाणवले आहे.
Previous articleअफवावर विश्वास न ठेवता शांतता राखा : जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन
Next articleअकोला विधान परिषद निवडणूक – मतमोजणीस सुरुवात; कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here