वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: बुलढाणा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला जावयासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी नाही लस नाही तर दारू द्यायची नाही असा फतवा काढल्याने तळीरामांचे चांगलेच वांदे झाले आहे.
सर्व देशी, विदेशी, मद्य, परमीट धारक यांनी सुद्धा लसीकरण प्रमाणपत्राची झेरॉक्स घेतल्याशिवाय मद्यविक्री करू नये असे निर्देश तहसिलदार राहुल तायडे यांनी मद्य विक्रेत्यांना दिले आहेत.
नांदुरा तहसील कार्यालय आज सकाळी या संदर्भात तहसीलदारांनी बैठक घेऊन सर्व मद्य विक्रेत्यांना सूचना दिल्या. या बैठकीला राकेश मिहानी, अनिल राठोड, संतोष बुरुकले, संजय टाकळकर, मुन्ना गोरले, अजय गुजर, शिवा देशमुख, रोशन पांडव, आशिष बुरुकले, मंगेश फरपट, संदीप बुरुकले, मंगेश बासोडे, लक्ष्मण भातुरकर आदी उपस्थित होते.