बुलडाणा- सध्या कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे सर्वच शाळा-कॉन्व्हेंट बंद आहेत. त्यामूळे शुकशुकाट असलेल्या शहरातील चिखली मार्गावर असलेल्या वॅâम्ब्रीज स्कूलमध्ये मसन्या उद या मांजरवर्गीय प्राण्यांनी हैदोस घातला. एक नव्हे तर तीन दुर्मिळ मसन्या उद मांजरीचे ३ पिल्ले शनिवारी, २६ सप्टेंबरला आढळून आले असून सर्पमित्र यश वानखडे व सहकाNयांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
बुलडाणा जिल्हा जंगलव्याप्त असून वैविध्यपूर्ण वन्यजिवाने समुद्ध आहे. येथे अनेक दुर्मिळ प्रजातीचे प्राणी आढळतात. २६ सप्टेंबरला वेंâब्रीज शाळेच्या बाथरूममध्ये मसन्या उद या वन्य प्राण्याची ३ पिल्ले संचार करतांना सफाई कामगारांना आज सकाळी १० वाजता आढळून आली. या बाबत सर्पमित्र यश वानखडे, शुभम अवशलकर, मुकुल अवशलकर, रवि मोरे यांना कळविले असता त्यांनी घटनास्थळी पोहचून तिन्ही पिल्लांना सुरक्षित पकडले आहे. या वन्य जिवांना येथील वनविभागाच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. मसन्या उद या प्राण्यासंदर्भात समाजात अनेक गैर समज आहेत. मसन्या उद माणसाचे प्रेत उकरून खातो, अशी अंधश्रद्धा असल्यामूळे या प्राण्याला पाहताच नागरीकांची भांबेरी उडते. मात्र मसन्या उद हा मांजरवर्गीय प्राणी असून तो नदीकाठी किंवा जंगलात बिळ करून राहणारा प्राणी आहे. वन विभागाने या वन्य जिवाला संरक्षण दिले आहे.