वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ‘कौशल्यातून रोजगाराकडे-एमपीएससी, युपीएससी परीक्षा’ या विषयावर शुक्रवार, २० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ ते ४.३० वा. दरम्यान मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील युवक-युवतींनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
२० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात जावळी (ता. सातारा)चे उपविभागीय अधिकारी सोपान टोपे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. आनंद पाटील, गंगटोक (सिक्कीम पूर्व) चे अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार निखारे हे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांना https://www.facebook.com/MaharashtraSDEED या फेबुक पेजद्वारे किंवा https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या यु-ट्यूब लिंकच्या सहाय्याने वेबीनरमध्ये सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींनी या सत्रात सहभागी व्हावे. काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.