डेल्टा प्लस: अकोला, बुलडाण्यात सोमवारपासून निर्बंध कडक

0
1940

मंगेश फरपट 
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला/बुलडाणा: राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधीत रुग्ण आढळून येत असल्याने व या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये लेवल-तीन मधील तरतूदीनुसार निर्बंध सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अकोला व बुलडाणा जिल्ह्याकरिता सोमवार दि. 28 जूनचे सकाळी सात वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिका-यांनी निर्गमीत केले आहेत. याअंतर्गत सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने आठवडाभर म्हणजे सोमवार ते रविवार उघडी ठेवता येणार आहे. मात्र बिगर जीवनावश्यक सेेवेची दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु असतील मात्र शनिवार व रविवार पुर्णपणे बंद असणार आहेत.

निश्चित करण्‍यात आलेली वेळ
सर्व प्रकारची जिवनावश्यक व अत्यावश्यक सेवा,किराणा, व भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेता यांची दुकाने, पिठाची गिरणी इ. व  सर्व प्रकाराची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने कोंबडी, मटन, पोल्ट्री मासे व अंडी यासह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दुध संकलन केंद्र, दुध वितरण व्यवस्था, पाळीव प्राणी यांची खाद्यपदार्थ विक्री दुकाने कृषी सेवा केंद्रे, कृषी निवीष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृह शेती अवजारे आणी शेतातील उत्पादनांशी संबंधीत दुकाने, ‍ शीव भोजन केंद्र 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. तर सर्व प्रकारची बिगर जिवनाश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने व प्रतिष्ठाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरु ठेवता येतील. मात्र शनिवार व रविवार पुर्णत: बंद ठेवावे लागतील.

इतर साठी ही आहे वेळ
१. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ – सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह व त्यानंतर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत व शनिवार रविवार पार्सल टेक अवे व घरपोच सेवा फक्त
२. सार्वजनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे, मॉनिंग वॉक व सायकलींग  – दरारोज सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत
३. सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना व कार्यालये- नियमितपणे
४. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय,निमशासकीय व खाजगी- नियमितपणे
५. क्रिडा, खेळ – सकाळी पाच ते दुपारी नऊ वाजेपर्यंत
६. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमलने, मनोरंजनात्मक कार्यक्रम
७. स्थानिक प्राधिकरण यांचे पुर्वपरवानगीने व 50 टक्के आसन क्षमतेसह लग्न समारंभ (कॅटरींग, बँडपथक, वधू-वर पक्ष सह) 50 लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्यालये, सभागृह, विवाह स्थळी (कोरोनांच्यानियमांच्या पालनसह) पूर्व परवानगीसह (शहराकरीता उपविभागीय अधिकारी, तालुका स्तरावरुन संबंधित मुख्याधिकारी नगर परिषद, नगरपालीका तसेच ग्रामीण क्षेत्राकरीता तहसिलदार)
८. अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीसह
९. सभा, बैठका, स्थानिक प्राधिकरण निवडणूक, सहकारी संस्था यांचे आमसभा – आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत
१०. बांधकाम- फक्त साईट असणारे प्रत्यक्ष मजुर अथवा बाहेरुन मजुर आणण्याच्या बाबतीत दुपारी चार वाजेपर्यंत
११. कृषी विषयक सेवा व कृषी सेवा केन्द्रे- दुपारी चार वाजेपर्यंत
१२. ई कॉमर्स वस्तु व सेवा – नियमितपणे पूर्ण वेळ (कोविड नियमांचे पालन करुन)
१३. जीम, व्यायामशाळा, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर एकूण क्षमतेच्या 50 टक्के पूर्व नोंदणी (Appointment)  सह वातानुकुलीत सेवेस परवानगी नाही
१४. सार्वजनिक वाहतूक सेवा – पूर्ण आसन क्षमतेसह वाहतूकीस परवानगी राहील तथापि प्रवासी यांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील.
१५. मालवाहतूक-  जास्तीत जास्त तीन लोकांना परवानगी अनुज्ञेय (चालक, मदतनीस व इतर एक) नियमितपणे पूर्ण वेळ वाहतूक करता येईल (कोविड नियमांचे पालन करुन)
१६. आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक  (खाजगी, कार, टॅक्सी, बस, रेल्वे व्दार) – नियमितपणे पूर्ण वेळ परंतु लेव्हेल पाच मध्ये जिल्ह्यामधून जाणे येणे होत असल्यास ई-पास बंधनकारक
१७. उत्पादन क्षेत्र, एमआयडीसी – नियमितपणे पूर्ण वेळ ( कोविडनियमाचे पालन करुन)
१८. उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक वस्तु व त्याकरीता लागणारे कच्चा माल उत्पादक व पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा, निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, संरक्षण संबंधीत उद्योग डाटा सेंटर, क्लॉऊड सर्व्हीस प्रोव्हायडर, माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुतीचे पायाभूत सेवा व उद्योग) – नियमितपणे पूर्ण वेळ
१९. उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग वगळून इतर सर्व प्रकारचे उद्योग जे अत्यावश्यक सेवा अंतर्गत समाविष्ट नाही व निर्यात प्रधान नाहीत) 50 टक्के कर्मचारी व कामगार यांना हालचाल करण्याच्या परवानगीसह

संपूर्ण शहरी व ग्रामीण भागामध्‍ये सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील.  तसेच सायंकाळी पाच नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच पर्यंत संचारबंदी लागू राहील.  या कालावधीमध्‍ये कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करण्‍यास मनाई राहील. आस्‍थापना/दुकाने/प्रतिष्‍ठाने ई ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना अंतर्गत स्‍वच्‍छता व सार्वजनिक शिस्‍तीचे पालन करावे.  कोविड नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आदेश कायम आहे. त्याचे अधिकार संबंधित अनुज्ञप्‍ती प्राधिकारी, महसूल विभाग, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन विभाग यांचे राहतील.

वरील आदेश हे सोमवार दिनांक 28 जून 2021 चे सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण शहर व जिल्‍हयातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleपातूर व बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संलग्न
Next articleशाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा, अनेक पिढ्यांचा उद्धार करणा-या ठरल्या – पुरुषोत्तम आवारे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here