अखेर निवडणूकीचा बिगुल वाजला

0
405

अकोला,वाशीम मध्ये जि.प.च्या रिक्त जागासाठी निवडणूक

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम, नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणा-या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यामुळे जिल्हयात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, जाहिर झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणूक कार्यक्रमाअंतर्गत 29 जूनरोजी अधिसूचना निघेल. 29 जून ते 05 जुलै ऑनलाईन नामनिर्देश पत्र भरणे, 06 जुलै 2021 नामनिर्देशन पत्र छाननी,  उमेदवारी मागे घेण्याची दिनांक 12 जुलै, 19 जुलै रोजी मतदान, 20 जुलैला मतमोजणी होणार आहे. अकोला जिल्हयातील 14 गट व 28 गणांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर, अडगाव बु. तळेगाव बु, अकोट तालुक्यातील अकोलखेडा व कुटासा, मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी, बपोरी, अकोला तालुक्यातील घुसर, कुरणखेड, कानशिवणी, बाळापूर तालुक्यातील अंदुरा, देगाव, बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा, पातूर तालुक्यातील शिर्ला या जि.प.गटासाठी निवडणूक होत आहे. तर पंचायत समिती गणासाठी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, अकोट तालुक्यातील पिंप्री खु., अकोलखेड, मुंड़गाव, रौंदळा, मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, ब्रम्ही खुर्द, माना, कानडी, अकोला तालुक्यातील दहिहंडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, बाळापूर तालुक्यातील निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, बार्शिटाकळी दगडपारवा, मो-हळ, महान, पुनोती बु. पातूर तालुक्यातील शिर्ला, खानापूर व आलेगाव गणासाठी निवडणूक घेण्यात येत आहे.
जिल्‍हा परीषद व त्‍याअंतर्गत येणा-या पंचायत समित्‍यांमधील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्‍हा परिषदमधील दानापुर, अडगांव बु., तळेगाव बु. अकोलाखेडा, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड,कानशिवणी, अंदुरा, देगांव, दगडपारवा व शिर्ला या 14 निवडणूक विभागातील  व पंचायत समितीमधील हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगांव, रौंदळा, लाखपुरी, ब्रम्ही खु., माना, कानडी, दहिहंडा,घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगांव, निमकर्दा, पारस भाग-1, देगांव, वाडेगाव भाग-2, दगडपारवा, मो-हळ, महान, पुनोती-बु, शिर्ला, खानापूर व आलेगांव या 28 निर्वाचक गणांकरिता पोटनिवडणुक घेण्‍यात येणार आहे.
मतदारसंघात आचारसंहिता
निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केल्‍यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत संबंधीत मतदारसंघात आचारसंहिता अंमलात राहील. राज्‍य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूकीच्‍या तारखांची सुचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्‍हाधिकारी मंगळवारी 29 जून रोजी प्रसिध्‍द करतील. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण होत राहील. मतमोजणी तारीख मंगळवार 20 जुलैरोजी सकाळी 10.00 वाजेपासून व निवडून आलेल्‍या सदस्‍यांची शुक्रवार 23 जुलैरोजी प्रसिध्‍द करण्‍यात येतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

गवळींच्या याचिकेनंतर निर्णय
वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजित आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषीत करण्यात आले होते . मात्र , घोषीत आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे आरक्षण अधिक होते . त्यामुळे या आरक्षणावर उच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती . यावर सुनावनी होवून उच्च न्यायालयाने निवडणूकीला स्थगिती दिली होती . तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जुन्याच कार्यकारीणीला मुदतवाढ दिली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते . त्यानंतर आरक्षणा संदर्भातील सर्व याचीका दाखल करून घेत न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते.

वाशिम जिल्ह्यात येथे निवडणूक
जिल्हा परिषदेमधील एकूण 52 जागापैकी 14 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होत्या. मात्र आरक्षण मुद्द्यावरून काटा, पार्डी, टकमोर, उकळी पेन , पांगरी नवघरे, कवठा खुर्द , गोभणी , भर जहागीर, दाभा, कंझरा, आसेगाव, भामदेवी , कुपटा, तळप बु., फुलउमरी या सर्कल मधील सदस्यांचे पद खारिज झाले होते. वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समिती अंतर्गत 27 पंचायत समिती सदस्य सुद्धा व्यक्त करण्यात आले होते या रिक्त पदांसाठी आता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला.

Previous articleबच्चूभाऊ बनले युसुफ खॉ पठाण, शासकीय कार्यालयांच्या झाडाझडतीसह मारले अवैध धंद्यावर छापे!
Next articleकोमेजलेल्या चेहऱ्यावर उमटली आंनदाची लहर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here