वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव :लांजुळ येथील शिक्षकाच्या मोबाईल एपद्वारे स्टेट बँकेच्या खात्यामधून 97,916 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिक्षकाने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांच्या जिओ सिमवर 9832650831 या अनोळखी क्रमांकावरून 1 जून रोजी फोन आणि मेसेज आला की क्विक अँड सपोर्ट आटोमॅटीक एसएमएस टू फोन अप डाउनलोड करायचे सांगितले. त्यावेळेस माझा फोन मुलाकडे होता. मुलाने अनवधानाने दोन्ही एप डाऊनलोड केल्यावर दोन्ही एपवरून 1 जूनला दुपारी 13999 आणि र 9,999 असे एकूण चोवीस हजार आठ रुपये स्टेट बँक खात्यातून काढण्यात आले. फोन-पे द्वारे शेगाव, खामगाव मार्गावर 19910 रुपये, 19,999, 19,999, 5 हजार रुपये, परत 5 हजार रुपये आणि सहाव्यांदा 4 हजार रुपये असे 73, 908 रुपये व 24,008 रुपये असे 97,916 रुपये बँक खात्यातून काढले.
अनोळखी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो नंबर स्विच ऑफ दाखवत होता. याबाबत शिक्षकाने स्टेट बँक शेगाव शाखेमध्ये जाऊन व्यवस्थापकाला माहिती दिली. नंतर 3 जून रोजी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावरून पोलिसांनी 420, सायबर गुन्ह्याचे कलम 66 क, ड कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार संतोष टाले तपास करत आहेत.