व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: दुस-या लाटेचा चांगला मुकाबला आपण केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविड मुक्त गावाचा संकल्प करून देशात एक उदाहरण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज समाज माध्यमांवरून नागरिकांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोविड रोखण्यात चांगली कामगिरी करणाऱ्या गावांच्या सरपंचांचे कौतुक केले.