न्यायासाठी तृतीयपंथीयांचा पोलीस स्टेशनमध्ये हल्लाबोल

0
623

एकाच्या घरी चोरी झाल्यानंतर पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप,
न्यायासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यातून पोहचले होते तृतीयपंथीय

मंगेश फरपट 
व-हा़ड दूत न्युज नेटवर्क 
बुलडाणा: जिल्हयातील मलकापूर येथील एका तृतीयपंथीयाच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्याचा ठपका ठेवत मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या तृतीयपंथीयांनी आकांडतांडव केले.
अचानकपणे पोलीस स्टेशन मध्ये सुरु झालेल्या आकांत तांडवानमुळे पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ उडाली होती. तृतीयपंथीयांनी आपले कपडे काढण्याचे प्रयत्न करताच पोलीस स्टेशन मधील कर्मचाºयांनी तेथून काढता पाय घेतला. बºयाच वेळानंतर सायंकाळी सर्वांची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र तृतीयपंथीयांचा पोलीस स्टेशनमध्ये आकांत-तांडव करीत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगरमध्ये राहत असलेली मोगराबाई (किन्नर, तृतीयपंथीय) यांच्याकडे ७ मे रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान काही लोकांनी घरात घुसून घरातील लोकांना धाक दाखवीत मारहाण करीत रोख रक्कम ५० हजार रुपये, बँक पासबुक, आधारकार्ड आणि दागिने असा पाच लाखापर्यंत ऐवज लुटून नेला, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. यात काही संशयितांची नावे सांगितल्या नंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करीत फिर्यादी मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील अनेक  तृतीयपंथीय समाजाच्या कानावर टाकली. त्यामुळे 17 मे रोजी संध्याकाळी नागपुर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव खान्देश आदी जिल्ह्यातील अनेक तृतीयपंथीयांनी मलकापूर गाठून मोगराबाईच्या तक्रारीनुसार तपास करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र मागणी करण्याची पद्धत जरा वेगळीच झाल्याने पोलीस स्टेशन मध्ये खळबळ उडाली. तृतीयपंथीयांनी कपडे काढून पोलिस स्टेशनवर आपला ताबा घेतला. आरडाओरड करू लागले तर  तृतीयपंथीयांनी पोलीस ठाण्यात जोरजोरात आकांत तांडव केला. काही तृतीयपंथीयांनी आपले कपडेही काढण्याचा प्रयत्न करताच पोलीस स्टेशन मधील कर्मचाºयांनी तेथून काढता पाय घेतला. एक तास चाललेल्या या प्रकारात पोलिसांनी सर्वांची समजूत काढल्यानंतर आणि प्रकरण आपसात झाल्यावर  हे प्रकरण शांत झाले. मात्र तृतीयपंथीय पोलीस स्टेशनमध्ये आकांत-तांडव करीत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Previous articleशेतक-यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा- आमदार राजेश एकडे 
Next articleमान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक; कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहावे- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here