वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची आणि मृत्यू संख्याही वाढत आहे. आता ब्लॅक फंगस आजाराची त्यात भर पडली आहे. जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे 16 रुग्ण आढळून आले असून यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला. हा आजार नवीन नसून जुनाच असल्याने त्वरित उपचार घेतल्यास रोग बरा होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे
ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ब्लॅक फंगसने बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समजते. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे. दोन ब्लॅक फंगसचे रुग्ण दगावल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. ब्लॅक फंगस हा आजार बुरशीजन्य संसर्ग आहे. कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर ब्लॅक फंगसने बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यात डोळयाच्या व चेह-याच्या एका बाजूला सूज येते, डोके दुखते, सायनस रक्तसंचय अशी या आजाराची लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस हा मेंदू, नाक, सायनसमध्ये वाढतो. आजार पसरत असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ब्लॅक फंगस पासून वाचण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे. फिजिशियन, कोरोना उपचार केंद्र, डेंटल क्लिनीक, नाक, कान घसा तज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची त्यासाठी गरज आहे असेही बोलले जात आहे. ज्या रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना ब्लॅक फंगसची लागण होत नाही.