भेंडवळ घटमांडणी: पाऊस कमी तर पृथ्वीवर संकटे

0
880

मंगेश फरपट 
व-हाड  दूत न्युज नेटवर्क 

बुलडाणा: सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी १५ मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराजांनी जाहिर केली. त्यानुसार राजा कायम राहणार असून संकटांचा सामना मात्र करावा लागणार आहे. दुसरे पृथ्वीवर अनेक संकटे येणार असून यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे भाकित महाराजांनी केले.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा घटमांडणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडली. त्याचे भाकित आज सकाळी जाहिर करण्यात आले. यावर्षी सार्वत्रीक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात मात्र सार्वत्रिक व चांगला पाऊस पडेल. या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत. तर ऑगस्ट महिन्यात जून-जुलै पेक्षा कमी पाऊस पडेल. सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस राहील. काही ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थितीचाही सामना करावा लागणार आहे. एकंदरीत पिक परिस्थिती चांगली राहील असा अंदाज आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पशुपालकांना चाराटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पृथ्वीवर अनेक संकटे
घटमांडणीच्या भाकितानुसार यावर्षी पृथ्वीवर अनेक संकटे येतील. यामध्ये नैसर्गीक संकटाचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. परकीय घुसखोरी, रोगराई, अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे.
राजा कायम पण करावा लागेल संकटाचा सामना
देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटाचा सामना करावा लागणार आहे. आर्थीक परिस्थिती, नैसर्गीक संकटांचा संकटांमुळे देशाची मोठ्या प्रमाणात हानी होईल. जिवीत हानी होणार असल्याने अनेकांना दु:खाचा सामना करावा लागणार आहे.

Previous articleलॉकडाऊनमध्येही 654 पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू
Next articleजिल्हाधिकारी होण्याचे प्रांजलचे स्वप्न अधुरे! कोरोनाने डाव साधला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here