पंकज भारसाकळे
व-हाड दूत न्युज नेटवर्क
तेल्हारा: कोविड संसर्ग काळात समाजातील प्रत्येक घटक सहयोगाची भावना ठेवून आहेत. काही अपवाद असू शकतात परंतु सार्वत्रिक सूर मदतीचा आहे. सध्या विविध कामांसाठी तलाठी कार्यालयात येणा-या लोकांचा कल लक्षात घेऊन अकोली रुपराव येथील तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी कोरोना सहायता निधी पेटी तलाठी कार्यालयासमोर ठेवली आहे. त्यात रक्कम टाकली जात आहे. यामुळे प्रेरित होऊन सौम्या मोरखडे या लहान मुलीने मदतीची तयारी दाखवली. शिवलाल रामचंद्र कराळे यांनी तिला दिलेले खाऊचे पैसे सौम्याने कसलाही विचार न करता आजोबा, माझे खाऊचे पैसे मदत पेटीत टाका,असे म्हणून पैसे पेटीत टाकले.
कार्यालयात येणारे शेतकरी, नागरिक,मुले कामासाठी तलाठी कार्यालयात येत आहेत. त्यांची दिवसभरातील संख्या लक्षात घेता चांगली रक्कम गोळा होत आहे. तसेच, मदत पेटीत गोळा झालेली रक्कम कोविड रुग्ण, फायटर्सवर यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली जात आहे. त्याचा लाभ रुग्ण तसेच कोविड फायटर्सना होत आहे. शिलानंद तेलगोटे यांनी मुख्यमंत्री कोरोना सहायता निधीला सर्वांनी जास्तीतजास्त सहाय्य करावे. कोरोना संसर्गाने सर्व भयभीत आहेत.परंतु विविध क्षेत्रातील कोरोना फायटर सेवा अविरत देत आहेत.त्यांना मदत व्हावी या प्रामाणिक उद्देशाने कोरोना मदत निधी पेटी कार्यालयात ठेवली आहे. नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्याकडून उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शिलानंद तेलगोटे यांनी सांगितले.
समाजातूनही मदतीचा हात पुढे यावा
समाजाच्या विविध भागातूनही मदतीचा हात पुढे यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. छोटू कराळे याच्याप्रमाणे नागरिक पुढे आले तर संबंधिताना मदत पोहोचवणे शक्य होईल.