सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने निर्बंधांबाबतचे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. यानुसार 20 एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 7 ते 11 या वेळेतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार आहेत. यामध्ये किराणा दुकाने सकाळी 7 ते 11, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने 7 ते 11, दुध व दुग्धजन्यपदार्थ विक्री सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 5 ते 7, मांस व अंडी 7 ते 11, शेजी औजारे आणइ शेतातील उत्पादनांशी संबधित दुकाने 7 ते 11, पाळीव प्राणी व खाद्य पदार्थाची दुकाने 7 ते 11, पावसाळी हंगाम सामुग्री संबधित दुकाने 7 ते 11, सर्व बँका, पोस्ट ऑफीस 9 ते दुपारी 1, बॅटरी,युपीएस साहित्याची दुकाने फक्त आवश्यकता भासल्यास रुग्णालये, कोविड रुग्णालये, क्रिटिकर सेंटर यांना साहित्य देण्यासाठी उघडी ठेवता येतील. इतर कोणत्याही परिस्थितीत संबधित दुकानदार व विक्रेते यांना दुकाने उघडून मालाची विक्री करता येणार नाही. जे व्यक्ती आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.