“दुध का दुध पाणी का पाणी हो जाएगा”
मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: 18 एप्रिल रोजी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर हल्ला करण्यात आला. हे दादागिरी दहशतीचा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सत्तारुढ पक्षाच्या शिवसेनेच्या आमदाराचा प्रयत्न आहे. हे भारतीय जनता पार्टी कदापिही सहन करणार नाही. कोरोना आणि महामारीचा विषय असल्याने आम्ही शांततेच्या मार्ग अवलंबला आहे, असे भारजीय जनता पार्टीचे माजी कामगार मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांनी भाजपा कार्यालयाच्या पत्रकार परिषदे सांगितले.
यावेळी या पत्रकार परिषदेला आ.श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, चैनसुख संचेती, योगेंद्र गोडे, विनोद वाघ, उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, काल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविषय जे अप शब्द बोलले. व माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण केली. याबाबत आम्ही शांततेच्या मार्ग अवलंबला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शांतता अबाधीत रहावे, याकरीता आम्ही आज जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन दिले. पोलिस अधिक्षकांनी कोणाचीही बाजू न घेता कोणत्याही दबावात न येता योग्य न्याय द्यावा. शिवसेनेतेच हे सभा, कार्यक्रम घेत कोरोना महामारी पसरविण्यास कारणीभूत आहे. आपल अपयश लपविण्यासाठी झाकण्यासाठी हे कट कारस्थान आहे. कोरोना लसीसाठी रुग्ण वनवन फिरत आहे.
लसीचा आरोप करत 17 लाख लसी शिल्लक असतांना यांनी स्टॉक करुन ठेवला परंतु पाठविला नाही हे आम्ही सिध्द केले. बाहेरच्या देशातून ट्रेनद्वारे आॅक्सीजन महाराष्टÑासाठी बोलवित आहे. केंद्र सरकार ही मदत करत आहे. सत्तरुढ पक्षाती नेत्यांमुळे ही महामारी वाढत आणि सर्वसामान्य जनतेला फटका बसत आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रेमडीसिविर 16 कंपन्यांंची नावे विचारली तर तेही सांगता येत नाही. रेमडीसिवर तुटवडा आहे. तोच प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. कोरोना रुग्णांबाबात केंद्र आणि राज्य ठिकाणी सर्वपरीने मदत करीत आहे, बेताल वक्तव्य आम्हाला करायचे नाही, आणि सण्या श्रेय घेण्याची वेळी नाही. त्यामुळे श्वेत पत्रीका काढा यावरुन कोणता पक्ष काय करत आहे समजेल आणि दुध का दुध पाणी का पाणी हो जाएगा असे यावेळी आ.डॉ.संजय कुटे यांनी सांगितले.