अकोला जिल्ह्यात दारुड्या मुलाकडून बापाची हत्या

0
305

अकोला : जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या दानापूर येथे दारुड्या मुलाने बापाची हत्या केल्याची घटना आज 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दानापूर येथे महादेव मिसाळ वय 60 वर्ष यांची त्यांचा मुलगा नारायण मिसाळ याने हत्या केली. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेने गावशिवारात खळबळ उडाली आहे.

Previous articleबुलडाणा जिल्ह्यात आज 129 पॉझिटिव्ह; 176 रुग्णांना सुटी
Next articleबारोमास नाटकाला झी नाट्य गौरवचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here