तर कोरोनाचे जंतू फडणीसांच्या तोंडात कोंबले असते: आमदार संजय गायकवाड आक्रमक

0
575

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलढाणा: राज्यातील  कोरोना परिस्थितीवर महा विकास आघाडी सरकारला टार्गेट करीत भाजपचे देवेंद्र फडणवीस महा विकास आघाडी सरकारला दोषी ठरवत आहेत. फडणवीस, चंद्रकांत पाटील हे नाहक सरकारला बदनाम करीत असल्याचा आरोप करीत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणतात कोरोनाचे जंतू मिळाले तर देवेंद्र फडणीस यांच्या तोंडात कोंबले असते.

करोनाच्या संकटातही भाजपचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ‘ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजतं की करोना काय आहे. त्यामुळं भाजपच्या लोकांनी राजकारण थांबवावं,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

भाजपच्या नेत्यांबद्दल असलेली चीड त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. ‘मला करोनाचे जंतू सापडले असते तर मी ते फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे,’ असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Previous articleअकोटचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक
Next articleउपरवाले से डरो ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here