सारंग कराळे |
वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अकोट शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे… अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सहसचिव गोपाल कराळे यांना मारहाण केल्याची तक्रार काल पोलिसात दाखल करण्यात आली असून यात ३५३ अंतर्गत गुन्हा दाख़ल केला.. अखेर या प्रकरणात गावंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून ही घटना काल शनिवारी घडली होती.