बुलडाणा जिल्ह्यात आज 129 पॉझिटिव्ह; 176 रुग्णांना सुटी

0
377

बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 683 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 554 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 115 व रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 421 तर रॅपिड टेस्टमधील 133 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 554 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 16, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, आंबेटाकळी 3, नांदुरा तालुका : बेलोरा 1, येराळी 1, जळगांव जामोद शहर : 4, मोताळा तालुका : कोथळी 1, लोणार तालुका : वडगाव 1, चिखली शहर: 8, चिखली तालुका : मेरा खु 1, ब्रह्मपु्र 7, महिमाळ 1, शिंदी हराळी 1, अंबाशी 2, पेठ 1, बुलडाणा शहर : 17, मलकापूर तालुका : धरणगाव 1, दाताळा 2, मलकापूर शहर : 12, शेगांव शहर : 2, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 3, सावखेड नजीक 2, तडेगाव 1, जळगाव जामोद तालुका : गाडेगाव 1, दे राजा शहर : 6, मेहकर तालुका: हिवरा आश्रम 1, दे राजा तालुका : गिरोली 1, दे धनगर 1, निमखेड 1, धोत्रा 1, दे मही 2, बुलडाणा तालुका : धाड 2, देऊळघाट 1, तांदुळवाडी 1, मेहकर शहर: 7, नांदुरा शहर : 13, मूळ पत्ता रिसोड जि वाशिम 1, परतवाडा जि अमरावती 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 129 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मलकापूर येथील 58 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 176 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 17, अपंग विद्यालय 2, खामगाव : 49, शेगाव: 15, दे. राजा : 27, चिखली: 20, मेहकर : 5, मलकापूर : 5, लोणार : 4, संग्रामपूर : 1, जळगाव जामोद : 8, नांदुरा : 8, सिंदखेड राजा: 13.
तसेच आजपर्यंत 27045 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4900 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4900 आहे.
आज रोजी 1202 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 27045 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6080 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4900 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1104 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 76 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Previous articleअकोल्याचे वृत्तप्रतिनिधी विशाल बोरे यांना प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार जाहीर
Next articleअकोला जिल्ह्यात दारुड्या मुलाकडून बापाची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here