कोरोनाकाळात केल्यात प्रेरणादायी स्टोरीज
दिल्ली: डीडी न्यूज दूरदर्शनचे अकोला जिल्हा वृत्तप्रतिनिधी विशाल बोरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात विशाल बोरे यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध प्रेरणादायी स्टोरीज दूरदर्शनच्या माध्यमातून देशभरात प्रसारित केल्या होत्या. त्यासाठी या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. या अगोदरही विशाल बोरे यांच्या स्टोरीला हिंदी कॅटेगरीमधून पूरस्कार मिळाला होता हे उल्लेखनीय.