बोर्डी नदीत वाहून गेलेल्या आणखी एकाचा मृतदेह सापडला, मुलगा बेपत्ताच

0
305

खामगाव: बोर्डी नदीकाठी बकºया चारण्यासाठी गेलेल्या बापलेकासह एक जण वाहून गेल्याची घटना काल सकाळी घडली होती. याघटनेतील वडिलांचा मृतदेह दुपारी सापडला होता. १६ वर्षाचा मुलगा व दुसरा व्यक्ती बेपत्ता होता. आज सोमवारी सकाळी गजानन लहानू रणसिंगे वय ३८ याचा मृतदेह मोरगावनजीक पाण्यात तरंगतांना दिसून आला.
सविस्तर असे की, खामगाव परिसरात रविवारच्या रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे खामगाव तालुक्यातून वाहणाºया बोर्डी नदीलाही मोठा पूर आला. नदीकाठी सोमवारी सकाळी बकºया चारत असतांना गजानन लहानू रणसिंगे वय ३८, राहुल गजानन रणसिंगे वय १६, दिलीप नामदेव कळसकार वय ४२ हे तिघे वाहून गेल्याची घटना घडली होती. यातील दिलीप नामदेव कळसकार याचा मृतदेह कालच नागरिकांना सापडला होता. तर बापलेक बेपत्ता होते. आज सकाळी गजानन रणसिंगे यांचा मृतदेह सापडून आला तर मुलगा राहूल अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु असल्याची माहिती माक्ताकोक्ता चे सरपंच गणेश ताठे यांनी ‘वºहाड दूत’शी बोलतांना दिली.

Previous articleकोरोनाग्रस्त गर्भवतीची प्रसूती
Next articleअकोल्याचे वृत्तप्रतिनिधी विशाल बोरे यांना प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here