पोलीसांनी काढली समजूत, जिल्हाधिकार्यांना निवेदन..!
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोट: कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संख्येत वाढ झाली असल्याने राज्य शासनाने शनिवार व रविवार संपूर्ण लाॅकडाऊन व सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
या निर्णया विरोधात ६ एप्रिलरोजी अकोट शहरातील रेडीमेड कापड कटलरी व इतर व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने शासनाच्या निर्णया विरोधात अकोट शहर पोलीस स्टेशन मध्ये जावून काही काळ ठिय्या आंदोलन केले.
आंदोलकाची अकोट शहर पोलीसानी समजूत काढून त्यांचे ठिय्या आंदोलन शांत केले मात्र व्यापारी असोसिएशने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देऊन दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते ४ पर्यंत उघडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आकोट तालुक्यात कोरोनाचा कमी प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही शासनानला नेहमी सहकार्य केले आहे तसेच सर्व व्यापारी बांधवानी कोविड चाचणी केल्या आहेत लाॅकडाऊन मुळे ५ हजार कामगार व त्याच्या परीवारावर शासनाच्या या निर्णयाने उपासमारीची पाळी आली आहे तरी शासनाने प्रतिबंध हटवून दुकाने ऊघडण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात व्यावसायिकांनी केली आहे.