मुलीच्या विनयभंगप्रकरणी पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा

0
230

खामगाव: मुलीच्या विनयभंगप्रकरणी येथील ५८ वर्षीय नराधमा पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. माक्ताकोक्ता येथील १७ वर्षीय मुलगी झोपली असतांना तिच्या बापाने वाईट उद्देशाने तिचा विनयभंग केला. तसेच तिला शिविगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी १३ जून २०१८ रोजी ग्रामिण पोलिस स्टेशनला पित्याविरुद्ध तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपी पित्यावर गुन्हे दाखल करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले होते. आज याप्रकरणाचा निकाल देत न्यायालयाने आरोपी पित्यास एकूण ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा सुनावली आहे.

Previous articleपोलीस विभागाचा “घे भरारी” प्रकल्प यशाचा सुवर्णमध्य साधणारा – डॉ.दिलीप भुजबळ पाटील
Next articleकोरोनाग्रस्त गर्भवतीची प्रसूती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here