वडी-पिंपळखुटा शेतरस्त्याचे काम नियमबाह्य, सरपंचाची तक्रार
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: तालुक्यात शेतरस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामध्ये वडी-पिंपळखुटा दरम्यान ३ किलोमिटरचा रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु असून त्यामध्येही घोळ करण्यात आला आहे.
हा ३ किलोमिटरचा रस्ता १३ फुटाचा मंजूर असून तो केवळ ६ फुट म्हणजे ५० ट्कक्यापेक्षाही कमी तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मो-यासहीत हा रस्ता २० फुटाचा असावा असे जाणकारांचे मत आहे. वडी ग्रामचे सरपंच पुंजाजी उखर्डा धोटे यांनी यासंदर्भात ठेकेदार संजय मुकूंद यांच्याशी संपर्क केला असता हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या मार्गदर्शनात होत असून आपणास काही अडचण असल्यास त्यांच्याशी बोलण्याचा उपरट सल्ला दिला आहे. या कामाबाबत ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कार्यकारी अभियंता यांची आज भेट घेणार असल्याचे सरपंच धोटे यांनी सांगितले.