सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांचे आवाहन
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोविड संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्कच्या किमती शासनाने निर्धारित केल्या आहेत. नागरिकांनी मास्क खरेदी करतांना या निर्धारित दरांनुसारच करावी, तसेच दुकानदारांनीही दरांची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावी,असे आवाहन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी केले आहे.
यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी मास्क खरेदी करतांना मास्कच्या निश्चित करण्यात आलेल्या दरानेच करावी. शासनाने निर्धारित केलेले प्रति मास्क दर याप्रमाणे- एन ९५ व्ही आकार-१९ रुपये, एन ९५ ३-डी-२५ रुपये, एन ९५ व्हॉल्व्ह रहित-२८ रुपये, मॅग्नम एन ९५ कप आकार- ४९ रुपये, व्हिनस सीएन ९५, एन ९५ कप आकार- २९ रुपये, व्हिनस सीएन ९५, एन ९५ कप आकार व्हॉल्व्ह रहित-३७, व्हिनस सीएन ९५, एन ९५ ६ आरई-कप आकार व्हॉल्व्ह रहित- २९ रुपये, एफएफपी मास्क- १२ रुपये, २-प्लाय सर्जिकल मास्क दोरी सह- तीन रुपये, ३-प्लाय सर्जिकल मास्क – चार रुपये, डॉक्टर किट-१२७ रुपये.
नागरिकांनी या दरांप्रमाणे मास्कची खरेदी करावी. जे दुकानदार या दरात मास्क विक्री करणार नाहीत त्यांची तक्रार बिलासह अन्न व औषध प्रशासन कार्यालय, अकोला येथे करावी असे आवाहन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने यांनी केले आहे.
संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता- सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, आकाशवाणी रोड. सिव्हिल लाईन्स, अकोला ४४४००१. दूरध्वनी ०७२४-२४२०२७७.
ई-मेल- acdrugsakola@gmail.com
०००००