रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू तीन जखमी

0
252

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: भरधाव रुग्णवाहिकेचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन कुटुंबातील पाच जणांना चिरडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका चार वर्षीय बालकाचा समोवश आहे. ही घटना 16 मार्चच्या रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास त्रिशरण चौकात घडली. अपघातात आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे चार वर्षीय बालक उघड्यावर पडले आहे.
शहरातील चिखली-खामगाव मार्गावरील त्रिशरण चौकात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या घिसडी समाजाच्या पडोळकर व सोळंके कुटुंबाने रस्त्याच्या कडेला पाल ठोकला होता. विळे, कु-हाडी, तवे तयार करून व त्याची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काल दिवसभर काम करून थकलेल्या कुटुंबातील सदस्य रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. काही वेळानंतर एम.एच.28/7136 क्रमाकांची रुग्णवाहिका चिखलीवरून बुलडाण्याकडे भरधाव येत होती. दरम्यान त्रिशरण चौकात येताच रुग्णवाहिकेचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडले.

Previous articleखाजगी शाळांमधील शुल्काबाबत सुचना पाठवा!
Next articleगुटखा प्रकरणात जामिन मिळू नये- ना. डॉ. राजेंद्र शिंगणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here