खांबोरा आणि घुसर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित; महावितरणची कारवाई

0
306

१ कोटी ५३ लाखाची थकबाकी
• महान आणि अकोट पाणी पुरवठा योजनावरही टांगती तलवार

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: पत्रव्यवहार  आणि पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने नाईलाजास्तव कारवाई करण्यात आली व या कारवाईत जिल्ह्यातील ६४ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या खांबोरा आणि घुसर पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा  वीज देयके थकल्याने खंडित करण्यात आला आहे.
महावितरण अकोला परिमंडलाच्यावतीने सर्व वर्गवारितील ग्राहकांकडील थकित देयके वसूलीसाठी जोरदार मोहिम उघडण्यात आली आहे. खांबोरा पाणी पुरवठा योजनेकडे १ कोटी ४ लक्ष १३ हजार व घुसर पाणी पुरवठा योजनेकडे ४८ लक्ष १२ हजार रूपयाची थकबाकी आहे.थकबाकी भरण्याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात आला ,पत्रव्यवहाराव्दारे  वीज बिल  भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.परंतू थकबाकी भरण्यासंदर्भात संबंधित विभागाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजास्तव महावितरणला ही  कारवाई करावी लागली.
याव्यतिरिक्त जिल्ह्यातील महान व अकोट पाणीपुरवठा योजनाही थकबाकीमुळे महावितरणच्या रडारवर असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रीया पुर्ण होणार आहे.परिणामी संपूर्ण जिल्ह्याला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे आणि याला संबंधित विभाग जबाबदार असणार आहे. मागील वर्षभराच्या सर्व वर्गवारीतील थकबाकीमुळे महावितरण आर्थिक संकटातून जात असल्याने वसूलीशिवाय वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य नाही.शिवाय महावितरणसमोर सर्व ग्राहके ही समान आहे.त्यामुळे महावितरणची कारवाई टाळण्यासाठी थकित देयकांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता अकोला पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

 

Previous articleएमपीएससी च्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Next articleशनि अमावस्या.. श्री शनिशिंगणापूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here