डुक्कर आडवे गेल्यामुळे अपघातात दोन शिक्षक जखमी

0
372

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: डुक्कर आडवे गेल्यामुळे अपघातात दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजता घडली. आपत्ती व्यवस्थापन जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी तत्परता दाखवत जखमींना उपचारार्थ भरती केले.
पिंजर ते बार्शीटाकळी रोडवर दोनद खु.जवळील अजणी फाट्यावर दुचाकीच्या आडवे डुक्कर गेल्याने या अपघातात दोन शिक्षक जखमी झाले. आज सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान अकोल्यावरुन रविंद्र नानाराव देशमुख रा.उगवा ह.मु.न्यु तापडीया नगर अकोला वय (51) आणी रत्नाकर प्रभाकर इंगळे रा.सिरसोली ता.तेल्हारा ह.मु.खडकी अकोला वय (50) हे पिंजर येथील ज्ञान प्रकाश विद्यालय येथे ड्युटीवर दुचाकीने जात असतांना अचानकपणे दोनद जवळील अजनी फाट्यावर डुक्कर आडवे गेल्याने ते दोघेही दुचाकीसह खाली कोसळले. या अपघातात दोघेजण जखमी झाले ही माहिती लगेच पिंजर येथील निलेश प्रदीपकुमार लहाने यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली आणी तात्काळ रुग्णवाहिका घेऊन मदतीसाठी बोलावले. लगेच जिवरक्षक दीपक सदाफळे पिंजर हे आपल्या रुग्णवाहिका सह तात्काळ 15 मिनटातच घटनास्थळी पोहचले आणी लगेच वेळ न घालवता अकोला येथे घेऊन गेले अशी माहिती पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी यांनी दीली आहे.

Previous articleकोरोना ने मरावे की मानसिक दबावाने..!
Next articleराज्यात जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here