व-हाड दूत न्युज नेटवर्क
शेगाव: उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावून मित्राने युवत्तीवर बलात्कार केल्याची घटना शेगावात घडली . याप्रकरणी तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोला येथील ३१ वर्षीय युवतीसोबत आेळख करून पारस येथील चेतन जामोदकर ( ३० ) याने मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी तिला उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगावला बोलाविले व शिवालय गेस्ट हाऊसमधील एका खोलीत नेवून बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत सदर युवतीने शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी चेतन जामोदकर याच्याविरुध्द कलम ३७६,४१७ , ५०६ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.