Home क्राइम अकोल्यात दगडाने ठेचून गवंडीची हत्या, आरोपी अटक
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क जवळ ३५ वर्षीय गवंडी काम करणा-या इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. ही हत्या किरकोळ वादातून झाली असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीस अटक केली आहे.
अकोला शहरात वाढीती गुन्हेगारी आपले डोके वर काढत आहे. पोलीस आपले कर्तव्य चोख पणे बजावत असले तरी गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अकोल्यातील नेहरू पार्क चौकजवळ दगडाने ठेचून श्याम शंकर घोडे वय ३५ या गवंडी काम करणा-या व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली. मृतक व्यक्ती हा खदान भागात सरकारी गोडाऊनच्या मागे राहत होता. पोलिसांना घटनास्थळावर दोन चिलम व रक्ताने माखलेले दगड मिळून आले होते. त्यामुळे ही हत्याच असल्याचा कयास पोलिसांनी लावला. खदान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरु केला.
आरोपी अटक
ही हत्या किरकोळ वादातून झाली असून सुमितकुमार राजेशकुमार शर्मा (वय ३२) असं मारेक-याचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील रामपुर येथील रहिवासी आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाली आहे. पोलिसांनी सध्या शर्माला ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासातच आरोपीला शोधण्यात यश मिळवले आहे.
© All Rights Reserved