व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोट जि. अकोला: हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भिली हे त्या पिडीत आदिवासी महिलेचे सासर असून अकोट तालुक्यातील वस्तापूर हे माहेर आहे. मागील काही दिवसांपासून सदर पिडीत महिला ही माहेरी वस्तापूर तिच्या मुलाची तब्बेत ठिक नसल्यामुळे योग्य इलाज करण्याकरीता माहेरी वस्तापूर पतीसह राहत होती.
काही दिवसापुर्वी पती हा कोणाला काही न सागंता हिवरखेड हद्दीतील भिली येथे आला व दुसरे लग्न केले हि पिडीत महिला भिली येथे गेली असता तिला घरातुन हाकलुन दिल्याचे समजते यावरून ती हिवरखेड पोलीस स्टेशन येथे पती विरूद्ध तक्रार देण्यास गेली असता हिवरखेड ठाणेदार दुसरे लग्न केल्याचे पुरावे मागत असून तक्रार घेण्यास नकार देत आहेत तसेच त्या पिडीत महिलेला अकोट ग्रामीण पोलीसात तक्रार देण्याची सल्ला देत असल्याचे समजते.