कोरोना संक्रमणाबाबत पालकसचिवांनी घेतला आढावा

0
265

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात कोरोना संक्रमाची व्याप्ति वाढत आहे. या संदर्भात प्रशासन सतर्क असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दूरदृष्य प्रणालीद्वारे आज पालकसचिव सौरभ विजय यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, पोलीस निरीक्षक मोनिका राऊत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेऊन मास्क न वापरण्यावर दंडात्मक कार्यवाही करुन मास्कचा वापर, सामाजिक अंतर व हात धुणे या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिलेत.
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून रॅपिड व आरपीटीएस चाचण्याचे प्रमाण वाढवा. तसेच विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावे. बाजारात व गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करावी. तसेच कोरोना उपाययोजनाबाबत जनजागृती करण्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

Previous articleफिरत्या केंद्राद्वारे स्वॅब संकलन; जिल्हाधिकारी पापळकर यांनी केली पाहणी
Next articleअकोल्यात पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here