बुलडाणा: एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु झाली आहे. आणि त्यातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह जिल्ह्यातील काही अधिकाºयांनी तक्रारी केल्या होत्या. त्याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जागी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुरेश घोलप यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त पदभार दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.