केंद्रीय रेल्वे मंत्र्याची घेतली भेट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम : 1947 नंतर देश स्वतंत्र झाला मात्र ब्रिटीशांनी सुरु केलेली शकुंतला ही रेल्वे आजही क्रिस्टल सरकारच्या गुलामगिरीत जखडलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले तरी ब्रिटीशांची भागिदारी अद्यापही मुक्त झाली नाही. ती मुक्त करुन तिचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याची मागणी खा. भावना गवळी यांनी केद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
1947 पूर्वी भारत इंग्रजाच्या गुलामीत होता तेव्हा देशातील इंग्रज सत्ताधार्यांनी आपल्या फायद्यासाठी काही सुविधा उपलब्ध केल्या. मात्र त्या सुविधा केवळ इंग्रजाच्या फायद्याच्या होत्या. मात्र 1947 नंतर चले जावच्या ना-याने इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली. अमरावती परिसरात कापूस अधिक पिकत होता तो तिकडे नेता यावा त्यादृष्टीने शकुंतला छोटी रेल्वेलाईन निर्माण केली. यवतमाळ, मुर्तीजापुर अकोला, अमरावती, वाशिम या तीन जिल्हयात धावत होती. मात्र तिची धावपट्टी खिळखिळी झाल्याने व त्यात इंग्लड सरकारची शंकुतलेमधील भागिदारी त्यामुळे शंकुतलेचा विकास होवु शकला नाही. गोयल हे महाराष्ट्रातील असल्यामुळे ते याकडे लक्ष घालतील अशी खा. गवळी यांनी व्यक्त केली.