राज्य परिवहनतर्फे दर रविवारी पर्यटन विशेष बस सुविधा

0
478

प्रशांत खंडारे
व-हाड दूत न्युज नेटवर्क 
बुलडाणा: राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्याकरीता लोकभिमुख पर्यटन सेवा दि. 7 फेब्रुवारी 2021 रोजी पासून सुरु करण्यात आली आहे. पर्यटन सेवा विशेष बस दर रविवारी सुरु राहणार असून ही बस बुलडाणा ते वेरुळ लेणी मार्ग जाळीचा देव, अजिंठा लेणी अशी राहणार आहे. सदर बस दर रविवारी बुलडाणा बसस्थानकावरुन सकाळी 7 वाजता निघणार आहे. ही बस 7.30 वाजता जाळीचा देव या ठिकाणी पोहचेल, 7.30 ते 8.30 वाजता देव दर्शनाकरीता वेळ राहील, सकाळी 9.15 वाजता अजिंठा येथे पोहचेल, 9.15 ते 1 वाजता अजिंठा लेणी पाहण्यासाठी वेळ राहील, दु. 3.10 वाजता वेरुळ येथे पाहचेल, 3.10 ते 6.15 वाजता वेरुळ लेणी पाहण्यासाठी वेळ राहील, 6.15 वाजता वेरुळ येथून 9.15 वाजता बुलडाणा येथे पाहचेल. बुलडाणा ते वेरुळ लेणी येथून परत बुलडाणा असे 314.2 कि. मी. असे एकुण प्रवास भाडे तिकिट प्रौढाकरीता 420 रुपये, लहान मुलांसाठी 210 रुपये भाडे असणार आहे. या बससेवेसाठी महामंडळाच्या अधिकृत www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर बुकिंग करावे. तसेच पर्यटन बस सेवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रण व विभागीय वाहतुक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Previous articleचला बोटींगला! ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीसह बरेच काही!
Next articleमनसेने लावले कंदिल अन दिवे! विज बिलाचा विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here