अकोला अर्बन बँकेतर्फे शनिवारी उद्योजकता कार्यशाळा

0
248

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला:
दि. अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अकोला व केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या सह्योगाने जिल्ह्यात नवउद्योजक निर्मितीच्या उद्देशाने शनिवार (दि.13) रोजी शुभमंगल सभागृहात ग्राहक मेळावा व उद्योजकता कार्यशाळाचे आयोजन होणार असल्याची माहिती  अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी  कळविले आहे.
उद्योजकता कार्यशाळेचे उद्घाटन विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे केन्द्रीय मंत्री संजय धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडु, विधान परिषदेचे सदस्य रणजीत पाटील, गोपीकिशन बाजोरीया, अमोल मिटकरी,  विधानसभेचे आमदार गोवर्धन शर्मा , गोपीकिशन बाजोरिया, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे, रणधीर सावरकर, नितीन देशमुख आदि उपस्थित राहणार आहे.  तर प्रमुख वक्ते सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे संचालक प्र.म. पार्लेवार मार्गदर्शन करतील.

Previous article‘त्या’च्या मुळेच तिची आत्महत्या!
Next articleUGC issues guidelines for colleges reopening

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here